breaking-newsमहाराष्ट्र
कोपरखैरणेतील 3 युवक समुद्रात बुडाले ; दोघांचे मृतदेह सापडले

अलिबाग : कोपरखैरणे येथील तरुण नागाव येथील समुद्रात बुडाल्याची घटना घडली आहे. चैतन्य सुळे(२०), आशिष मिश्रा(२४) आणि सुहाद सिद्दगी (२१) हे तिघे युवक शुक्रवारी संध्याकाळी ७.३० वाजता अलिबाग जवळच्या नागाव समुद्रात पोहायला गेले असता बुडून समुद्रात बेपत्ता झाले होते.
त्यांच्यापैकी आशिष मिश्रा याचा मृतदेह आज सकाळी कोर्लई किनारी तर सुहास सिद्दगी या मृतदेह आग्राव समद्र किनारी सापडला असल्याची माहिती अलिबागचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक सुरेश वराडे यांनी दिली आहे. चैतन्य सुळे याचा शोध पोलीस व स्थानिक मच्छिमार बांधव घेत आहेत. अंधारात पोहायला जाऊ नका अशी सूचना या सर्वच मुलांना स्थानिक ग्रामस्थांनी दिली होती; अशी माहिती स्थानिक पोलिसांनी दिली आहे.