breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेस आणि जेडीएस मध्ये छुपा समझोता – मोदींचा आरोप

तुमकुरू – कर्नाटकच्या विधानसभा निवडणुकीत कॉंग्रेस व जनता दल सेक्‍युलर या पक्षांमध्ये छुपी युती झाली असल्याचा आरोप पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी येथील एका जाहीर सभेत केला. जनता दल सेक्‍युलर पक्षाचे प्रमुख एच. डी. देवेगौडा हे कॉंग्रेसला संरक्षण देत असल्याचा आरोपही त्यांनी केला आहे.

या सभेत बोलताना मोदींनी कॉंग्रेसच्या कारभारावर चौफेर टीका केली ते म्हणाले की गेली अनेक वर्षे कॉंग्रेस केवळ दारिद्र निर्मुलनाच्या बाता मारीत आहे. पण इतकी वर्षे सत्ता उपभोगून त्यांनी सतत शेतकरी आणि गरीबांवर अन्यायच केला असे ते म्हणाले. कर्नाटकात जेडीएस कधीच स्वबळावर सरकार स्थापन करू शकत नाही हे अनेक जनमत चाचण्यांमधून निष्पन्न झाले आहे. त्यामुळे सरकार बदलण्याची ताकद केवळ भाजपमध्येच आहे असेही त्यांनी नमूद केले. विशेष म्हणजे मोदींनीच काही दिवसांपुर्वी माजी पंतप्रधान देवेगौडा यांच्यावर स्तुती सुमनांचा वर्षाव केला होता. पण आज अचानक त्यांनी आपली भूमिका बदलून त्यांच्यावर टीका केल्यान आश्‍चर्य व्यक्त केले जात आहे.

कर्नाटकात त्रिशंकु स्थिती निर्माण होईल व सत्तेसाठी भाजप आणि जेडीएस यांच्यातच युती होईल असा सर्वसाधारण अंदाज मांडला जात असताना आज मोदींनी मात्र जेडीएस वर टीका करून राजकीय निरीक्षकांना पेचात टाकले आहे. कॉंग्रेसने जेडीएस बरोबर छुपी यूती जाहीरपणे मान्य करावी असे आवाहन त्यांनी केले. बंगळुरू शहरात कॉंग्रेस-जेडीएस युतीतूनच महापौर झाला आहे याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

देवेगौडा यांचा आपण अजून सन्मान करतो असेही मोदी यावेळी म्हणाले. ते म्हणाले की सन 2014 च्या लोकसभा निवडणुकीच्यावेळी देवेगौडा असे म्हणाले होते की मोदी जर देशाचे पंतप्रधान झाले तर आपण आत्महत्या करू. पण ते समाज हितासाठी आणखी शंभर वर्ष जगले पाहिजेच अशीच आपली कामना आहे असेही मोदी यांनी नमूद केले. कर्नाटकातील चांगल्या विकासासाठी आणि भवितव्यासाठी कॉंग्रेसला पराभूत करा असे आवाहनही त्यांनी जनतेला केले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button