breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कॉंग्रेसच्या नवीन नियुक्‍त्या…

  • हिमाचल प्रदेशची सूत्रे रजनी पाटील यांच्याकडे 

नवी दिल्ली – कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी पक्षाच्यावतीने काही नवीन नियुक्‍त्या आज घोषित केल्या आहेत. त्यानुसार हिमाचल प्रदेशसाठी पक्षाच्या निरीक्षक म्हणून राज्यसभेच्या माजी खासदार रजनी पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली आहे. या आधीचे हिमाचलप्रदेशचे निरीक्षक माजी गृहमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी आपली जबाबदारी सोडल्यामुळे ही नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी एका निवेदनाद्वारे या नवीन नियुक्‍त्यांची माहिती दिली. बिहार साठी पक्षाचे प्रभारी म्हणून विरेंद्र सिंग राठोड आणि राजेश लिलोथिया यांची नियुक्ती करण्यात आली असून पक्षाच्या अल्पसंख्य विभागाचे अध्यक्ष म्हणून नदीम जावेद यांची नियुक्ती करण्यात आली आहे. आधीचे अध्यक्ष खुर्शिद अहमद यांच्या जागी ही नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच पक्षाच्या गुजरात शाखेचे निरीक्षक म्हणून जितेंद्र बाघेल आणि विश्‍वरंजन मोहंती यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button