breaking-newsराष्ट्रिय

कॉंग्रेसच्या कॉम्प्युटर सेलची पुनर्ररचना

नवी दिल्ली – कॉंग्रेसने आपल्या राष्ट्रीय पातळीवरील कॉम्प्युटर सेलची पुनर्रचना केली आहे. या सेलला डाटा ऍनॅलॅटिक्‍स डिपार्टमेंट असे नवे नाव देण्यात आले असून यापुढे कॉम्प्युटर सेल डाटा ऍनॅलॅटिक्‍स डिपार्टमेंट या नावाने संबोधला जाईल. या विभागाच्या राष्ट्रीय समन्वयक म्हणून स्वप्ना पात्रोनिस यांची नियुक्ती करण्यात आली असून अशोक वरदराजन आणि अदित्येश्‍वर सिंगदेव यांची सहसमन्वयक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

पक्षाध्यक्ष राहुल गांधी यांची या नियुक्‍त्या केल्याची माहिती पक्षाचे सरचिटणीस अशोक गेहलोत यांनी निवेदनाद्वारे दिली. पक्षाच्या संगणक सेलची व्याप्ती वाढवून त्यात मोठ्या प्रमाणात डाटा ऍनॅलॅसिस केले जाणार आहे आणि त्याचे व्यवस्थापन परिणामकारपणे करण्यासाठी ही पुनर्ररचना करण्यात आल्याचे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button