breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

केएसबी चौकातील भुयारी मार्गात महिलेच्या गळ्यातील मंगळसुत्र चोरुन नेले

पिंपरी –  केएसबी चौकातील भुयारी मार्गात एका ४३ वर्षीय महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनी सोन्याचे मंगळसुत्र अज्ञात चोरट्यांनी हिसका मारुन चोरुन नेले. ही घटना मंगळवार (दि.७) रात्री पावणेदहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील केएसबी चौकातील भुयारी मार्गात घडली.

याप्रकरणी ४३ वर्षीय महिलेने भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार, दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, मंगळवार रात्री पावणेदहाच्या सुमारास भोसरी एमआयडीसी येथील केएसबी चौकातील भुयारी मार्गात फिर्यादी ४३ वर्षीय महिला या पायी चालल्या होत्या. यावेळी मागून आलेल्या दोघा चोरट्यांनी महिलेच्या गळ्यातील १ लाख रुपये किमतीचे ४० ग्रॅम वजनी सोन्याचे मंगळसुत्र हिसका मारुन चोरुन नेले. याप्रकरणी भोसरी एमआयडीसी पोलीस ठाण्यात दोन अनोळखी चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस उपनिरीक्षक बांबळे चोरट्यांचा शोध घेत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button