breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

केंद्रीय कर्मचाऱ्यांचं वेतन आता दरवर्षी वाढणार; अर्थ मंत्रालयातील सुत्रांची माहिती

नवी दिल्ली : केंद्रीय कर्मचाऱ्यांना लवकरच एक खुशखबर मिळण्याची शक्यता आहे. मोदी सरकार वेतन आयोगाची पद्धत बंद करून केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दरवर्षी वाढ करण्याच्या विचारात आहे. यासाठी एका समितीचीही स्थापना करण्यात आली असून दरवर्षी वेतन वाढीच्या प्रस्तावामुळे अर्थ व्यवस्थेवर होणाऱ्या परिणामांचा विचार केला जात आहे.
अर्थ मंत्रालयातील सुत्रांच्या माहितीनुसार, वेतन आयोगाची परंपरा केंद्र सरकारला संपुष्टात आणायची आहे. केंद्रीय कर्मचाऱ्यांना नियमित स्वरुपात वेतनात वाढ मिळायला हवी, अशी सरकारची भूमिका आहे. त्यासाठीचे काही मापदंड निश्चित करण्याचीही तयारी सरकारने ठेवली आहे.
सातव्या वेतन आयोगाचे मुख्य न्यायाधीश एके माथुर यांनीही केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतनात दर दहावर्षांनी वाढ करण्याऐवजी दरवर्षी वाढ करणं फायद्याचं ठरू शकतं असं मत नोंदवलं आहे. असं केल्याने दहा वर्षांनी एकत्र पडणारा बोझा कमी होईल आणि याच कारणामुळे सरकराने या निर्णयाचा सकारात्मक विचार करण्यास सुरुवात केलीय. यासंदर्भात राज्यांच्या सरकारचंही मत जाणून घेतलं जाणार आहे. केंद्राने आपल्या कर्मचाऱ्यांच्या वेतनात वाढ करण्याचा निर्णय घेतला तर राज्यांनाही आपल्या कर्मचाऱ्यांचीही वेतनवाढ करावी लागणार आहे.

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published.

Back to top button