Uncategorized

‘कृष्णा’च्या 7 माजी संचालकांना अटक; खासदार साबळे यांच्या लढ्याला यश

पुणे: सातारा जिल्ह्यातील कराड येथील कृष्णा सहकारी साखर कारखान्यातील 292 ऊस तोडणी कामगारांच्या कागदपत्रांचा गैरवापर करून त्याआधारे त्यांच्या नावे बनावट कर्ज घेणाऱ्या 7 माजी संचालकांना अटक करण्यात आली. या प्रकरणावर शेतकऱ्यांच्या बाजूने गेल्या वर्षभरापासून खासदार अमर साबळे यांच्या सुरू असलेल्या लढ्याला अखेर यश मिळाले आहे.

उदयसिंग प्रतापसिंग शिंदे, वसंत सीताराम पाटील, महेंद्र ज्ञानू मोहिते, अशोक मारुती जगताप, सर्जेराव रघुनाथ लोकरे, संभाजीराव रामचन्द्र जगताप आणि बाळासाहेब दामोदर निकम असे अटक करण्यात आलेल्या संचालकांची नावे आहेत. तर कारखान्याचे माजी चेअरमन अविनाश मोहिते आणि माजी व्हाइस चेअरमन सुरेश पाटील यांना दोन महिन्यांपूर्वीच अटक करण्यात आली आहे.

कराड येथील या पीडित शेतमजुरांनी कृष्णा शेतकरी शेतमजूर संघाकडे 2013-14 साली ऊस तोडणीचा करार केला होता. त्यावेळी या सर्व शेतकऱ्यांचे आर.सी बुक, फोटो, ओळखपत्र, रहिवासी दाखला, पॅनकार्ड ही कागदपत्र जमा करण्यात आली होती. कृष्णा शेतकरी आणि शेतमजूर सेवा संघाचे माजी अध्यक्ष आणि राष्ट्रवादीचे नेते अविनाश मोहिते, उपाध्यक्ष सुरेश पाटील, व्यवस्थापक उत्तम पाटील, कर्मचारी राहुल देसाई, संभाजी भंडारी तसेच बँकेचे शाखाधिकारी या सर्वांनी संगनमत करून ही कागदपत्र कराड येथील बँक ऑफ इंडिया या बँकेत सादर केले. त्याठिकाणी शेतकऱ्यांच्या खोट्या सह्या करून त्या आधारे प्रत्येक शेतमजुराच्या नावे प्रत्येकी 7 लाख रुपयांप्रमाणे 20 कोटी 44 लाख रुपये कर्ज घेऊन या पैश्यांचा अपहार केला होता. काही दिवसांनी बँकेचे कर्ज थकल्यानंतर बँकेकडून या शेतमजुरांच्या नावे नोटिसा काढण्यात आल्यानंतर हा भ्रष्टाचार उघडकीस आला. यासंदर्भात पीडित शेतमजुरांनी कराड पोलीस ठाण्यात धाव घेतली. मात्र, पोलिसांनी फिर्याद दाखल करून घेण्यास टाळाटाळ केली. या संबंधी पीडित शेतमजुरांनी खासदार साबळे यांची भेट घेऊन या प्रकरणात लक्ष घालून न्याय मिळवून देण्याची मागणी त्यांच्याकडे केली होती. या घटनेची खासदार साबळे यांनी दखल घेत पिंपरी-चिंचवड आणि सातारा येथे पत्रकार परिषद घेऊन न्याय मिळेपर्यंत पीडित शेतमजुरांच्या पाठीशी ठामपणे उभे राहणार असल्याचे सांगितले. सातारा पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून सर्वसामान्य शेतमजुरांची फसवणूक करणाऱ्यांविरोधात तात्काळ गुन्हे दाखल करण्याची मागणी त्यांनी लावून धरली होती. या प्रकरणाची सर्व वस्तुस्थिती त्यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितली होती. तसेच 292 शेतमजुरांचा हा प्रश्न त्यांनी वारंवार शासन दरबारी मांडून पाठपुरावा केला होता. अखेर त्यांच्या या पाठपुराव्याला यश आले. त्यांच्या सहकार्याबद्दल पीडित शेतमजुरांनी त्यांचे आभार मानले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button