breaking-newsराष्ट्रिय
कृषि क्षेत्राची वाढ चौथ्या तिमाहीत घसरून ४.५ टक्क्यांवर

नवी दिल्ली : शेती क्षेत्राच्या सुधारणेसाठी विविध प्रयत्न करण्यात येत असले तरी, ते कमी पडत असल्याचे दिसून येत आहे. कारण, जानेवारी ते मार्च या २०१७-१८ च्या तिमाहीत भारतीय कृषि क्षेत्राची वाढ घसरून ४.५ टक्के नोंदवली गेली आहे. मागील वर्षी याच दिवसांत भरघोस उत्पादन नोंदवले गेल्याने हे प्रमाण ७.१ टक्के इतके होते.
यात ग्रॉस व्हॅल्यू अॅडेडमध्ये सध्याच्या किंमतींत लक्षणीय घट दिसून आली असून त्याचा परिणाम शेतीविषयक वस्तूंच्या महागाईवर दिसून येत आहे. हे भाव २०१४-१५ पासून सातत्याने घसरत होते. कारण तेलबिया, डाळी आणि कापसाच्या किंमती कमी राहिल्या होत्या. तज्ज्ञांच्या मते, यापुढील काळात सन २०१८ मध्ये देशभरात मोसमी पावसाचे प्रमाण सामान्य राहिले, तर भारत शेती आणि त्यासंबंधी बाबीत ४ टक्के प्रगती करू शकतो.