पुणे

कुलभूषण जाधव यांच्या मुक्ततेच्या मागणीकरीता आंदोलन

पुणे – कुलभूषण जाधव बचाव, पाकिस्तान हटाव… सरबजीतसिंग भारताने गमाविला, परंतु कुलभूषणला वाचविणार… एक धक्का और दो, पाकिस्तान तोड दो… भारत माता की जय… अशा घोषणा देत भारतीय नौदलाचे निवृत्त अधिकारी कुलभूषण जाधव यांची पाकिस्तानने मुक्तता करावी आणि याबद्दल भारत सरकारने पाकिस्तानला धडा शिकवावा, या मागणीकरीता समस्त हिंदू आघाडीतर्फे रविवारी आंदोलन करण्यात आले.
महात्मा फुले मंडईतील टिळक पुतळ्यासमोर झालेल्या आंदोलनात आघाडीचे कार्याध्यक्ष मिलींद एकबोटे, ऍड.मोहनराव डोंगरे, प्रतिक मोहिते, लोकेश कोंढरे, बाळासाहेब विश्वासराव, संतोष गायकवाड, षिकेश पवार, राजेंद्र बेंद्रे, अनिरुद्ध बनसोड, सौरभ कर्डे, प्रशांत किराड यांसह कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
मिलींद एकबोटे म्हणाले, कुलभूषण जाधव यांचे अपहरण करुन पाकिस्तानने त्यांच्यावर खटला दाखल केला आणि त्यांना फाशीची शिक्षा सुनावली, हा केवळ अन्याय नाही तर भारतातील प्रत्येक नागरिकाचा अपमान आहे. निरपराध भारतीयांना पकडून त्यांच्या जीवाला धोका निर्माण करण्यापर्यंत पाकिस्तानची मजल गेली आहे. जर पाकिस्तानने याबाबत फसवणूक केली तर त्यांच्यावर हल्ला करुन त्यांना कायमची अद्दल घडविण्याचा निर्धार सरकारने केला पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button