breaking-newsराष्ट्रिय

कुमारस्वामींच्या शपथविधी सोहळ्यात विरोधकांचे शक्तीप्रदर्शन

बंगळुरु : कर्नाटकमध्ये आज जेडीएस-काँग्रेसचं सरकार स्थापन झाले. जेडीएस नेता एचडी कुमारस्वामी हे कर्नाटकचे नवे मुख्यमंत्री झाले. राज्यपालांनी त्यांना मुख्यमंत्रीपदाची शपथ दिली. तर काँग्रेसच्या जी. परमेश्वर यांनी कर्नाटकच्या उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. यावेळी भाजप विरोधा सर्व पक्षांचे नेते एकाच मंचावर शक्तीप्रदर्शन करताना दिसत होते. 2019 च्या लोकसभा निवडणुकीआधी भाजपविरोधात महाआघाडीचे हे संकेत आहेत.

कुमारस्वामी यांच्या शपथ विधी कार्यक्रमानंतर सोनिया गांधी, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, अखिलेश यादव, मायावती, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्रबाबू नायडू, आरजेडी नेता तेजस्वी यादव, सीताराम येच्यूरी यांच्यासह अनेक विरोधी नेते एकत्र आले होते.

अनेक दिवसानंतर सर्व विरोधी पक्षाचे नेते एकाच मंचावर दिसत होते. पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बनर्जी, केरळचे मुख्यमंत्री पिनराई विजयन आणि दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल हे देखील या कार्यक्रमाला उपस्थित होते. उत्तर प्रदेशातील एकमेकांचे विरोधक मायावती आणि अखिलेश यादव आज एकाच मंचावर एकत्र दिसत होते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button