breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कुदळवाडीत टायरच्या गोदामाला आग

पिंपरी-  कुदळवाडी येथील टायरच्या गोदामाला गुरुवारी (दि.26) दुपारी दीडच्या सुमारास अचानक आग लागली. त्या आगीत तेथील दहा ते बारा टायरची गोदामे जळून रांखरांगोळी झाली आहे. ती आग विझविण्यासाठी महापालिकेच्या संत तुकारामनगर येथील महापालिकेच्या अग्निशमन केंद्राच्या तीन गाड्या, एमआयडीसीच्या तीन गाड्या आणि भोसरीतील दोन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. यामुळे टायरच्या गोदामाला लागलेली आग विझविण्यास जवानांनी शर्थीचे प्रयत्न केले.

कुदळवाडी येथील टायरच्या गोदामाला आग लागल्याने आगीने रौद्र रूप धारण केले होते. आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी अग्निशामक दलाच्या जवानांचे शर्थीचे प्रयत्न केले. त्या घटनेची माहिती मिळताच  संत तुकाराम नगर, राहटणी, प्राधिकरण, भोसरी, एमआयडीसी विभागाचे १० ते १५ बंब घटनास्थळी दाखल झाले आहेत. आग विझवण्याचे काम सुरू आहे. दरम्यान,  गोडाऊनच्या मागील बाजूस पडलेल्या गवताला आग लागली होती. त्याकडे नागरिकांनी दुर्लक्ष केले. त्यामुळे ही आग पसरत गेली. या ठिकाणी अनेक भंगाराची दुकाने असल्यामुळे या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे सांगण्यात येते.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button