breaking-newsराष्ट्रिय
कुख्यात डॉन अबू सालेम खंडणी प्रकरणात दोषी

नवी दिल्ली – एका व्यावसायिकाकडून खंडणी मागितल्याबद्दल येथील न्यायालयाने आज कुख्यात डॉन अबू सालेम याला दोषी ठरवले. आता त्याला 21 जुलै या दिवशी शिक्षा सुनावली जाणार आहे. सालेमने दिल्लीचा रहिवासी असणाऱ्या अशोक गुप्ता नामक व्यावसायिकाकडून 2002 मध्ये तब्बल 5 कोटी रूपयांची खंडणी मागितल्याचा आरोप होता.
त्यावरून दिल्लीत गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणी आता न्यायालयाने सालेमला दोषी ठरवले आहे. सालेमला 2002 मध्ये पोर्तुगालमध्ये अटक करण्यात आली. त्यानंतर त्याला भारताच्या ताब्यात देण्यात आले. मुंबई साखळी बॉम्बस्फोट (1993) आणि इतर काही प्रकरणांत सालेमला याआधीच दोषी ठरवण्यात आले आहे. आता खंडणी प्रकरणात त्याला ठोठावल्या जाणाऱ्या शिक्षेबाबत उत्सुकता आहे.