breaking-newsराष्ट्रिय
काश्मीरातील स्फोटात तीन जवान जखमी
श्रीनगर – काश्मीरात शोपिया जिल्ह्यात आज झालेल्या एका आयईडी स्फोटात तीन जवान जखमी झाले. या जिल्हयाच्या झैनापोरा भागात 44 राष्ट्रीय रायफल्सचे जवान आपल्या वाहनातून जात असताना त्यांचे हे वाहन आयईडीचा स्फोट घडवून उडवून देण्यात आले. त्यात हे तीन जवान जखमी झाले आहेत.
स्फोटात जवानांच्या वाहनाचेही मोठे नुकसान झाले आहे. या जवानांवर लष्करी रूग्णालयात उपचार सुरू आहेत. तथापी त्यांची प्रकृती धोक्याबाहेर आहे असे सांगण्यात येते.