breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काश्मीर, काश्मिरी आणि कश्मिरियत सुद्धा आमचीच; राजनाथ सिंह

गंगटोक (सिक्किम) –काश्मीर खोऱ्यात गेल्या काही महिन्यांपासून दहशतवाद आणि दगडफेकीच्या घटनांमध्ये प्रचंड वाढ झाली आहे. यावर एनडीए सरकारला कायमचा तोडगा हवा आहे. काश्मीर, काश्मिरी आणि कश्मिरियत सुद्धा आमचीच अशा शब्दात गृहमंत्री राजनाथ सिंह यांनी पाकिस्तानला ठणकावले आहे. ते सध्या 3 दिवसांच्या सिक्किम दौऱ्यावर आहेत. तत्पूर्वी याच दौऱ्यात शनिवारी बोलताना त्यांनी ड्युटीवर शहीद होणाऱ्या निमलष्करी दलाच्या जवानांच्या वारसांना 1 कोटी रुपयांची मदत दिली जाणार असे आश्वस्त केले.
निमलष्करी दलातील शहीदांच्या वारसांना 1 कोटी
सिक्किम दौऱ्यात शनिवारी राजनाथ सिंह यांनी एक महत्वाची घोषणा केली. त्यानुसार, निमलष्करी दलातील एखादे जवान शहीद झाल्यास त्यांच्या वारसांना 1 कोटी रुपयांची मदत दिली जाणार आहे. यासोबतच, निमलष्करी दलातील 34 हजार काँस्टेबल लवकरच पदोन्नती देऊन हेड काँस्टेबल केले जातील असेही राजनाथ सिंह यांनी सांगितले.