breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय
काळ्यापैशाप्रकरणी कुटुंबियांना दिलासा नाही

नवी दिल्ली – काळ्या पैशाप्रकरणी पी. चिदंबरम यांच्याविरोधात सुरु असलेल्या कारवाईला स्थगिती देण्यास मद्रास उच्च न्यायालयाने आज नकार दिला. चिदंबरम यांच्या पत्नी नलिनी, मुलगा कार्ती आणि सून श्रीनिधी यांच्याविरोधात परदेशात बेहिशोबी मालमत्ता दडवून ठेवल्याच्या आरोपावरून प्राप्तीकर विभागाने चेन्नईमध्ये आर्थिक गुन्हे विषयक विशेष न्यायालयामध्ये खटला दाखल केला आहे.
नलिनी, कार्ती आणि श्रीनिधी यांनी केंब्रिज येथील 5.97 कोटी रुपयांची मालमत्ता दडवून ठेवल्याचा आरोप आहे. याशिवाय इंग्लंडमधील मेट्रो बॅंक आणि अमेरिकेतील नॅनो होल्डिंग कंपनीतली गुंतवणूक आणि सहमालकी असलेल्या चेस ग्लोबल कंपनीतील गुंतवणूक कार्ती यांनी उघड केली नसल्याचा आरोपही प्राप्तीकर विभागाने केला आहे.