कामगारांचा पगार थकवणा-या कंपनीवर कारवाई करा

- पुणे जिल्हाधिका-याकडे विरोधी पक्षनेते दत्ता साने यांची मागणी
पिंपरी ( महा ई न्यूज ) – स्वारगेट ते पिंपरी या मार्गावर महामेट्रो प्रकल्पांचे काम सुरु आहे. पिंपरी ते रेंजहिल्स यादरम्यान होणा-या मेट्रो स्टेशनचे काम मे.एचसीसी अल्फा इन्फ्रा प्राजेक्ट प्रा. लि. कंपनीला दिले आहे. त्या कंपनीच्या कामगाराचे मागील पाच महिन्याचा पगार होत नसल्याने उपासमार होत आहे. तसेच एक वर्षाचा कामगारांचा पीएफ, ईएसआय देखील भरलेला नाही. त्यामुळे त्या कामगारांचा पगार तातडीने द्यावा, तसेच कंपनीवर कडक कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते दत्ता साने यांनी केली.
यासंदर्भात पुणे जिल्हाधिकारी यांना निवेदन दिले, त्या म्हटले आहे की, पिंपरी ते रेंजहिल्स येथे मेट्रो स्टेशनचे काम सुरु आहे. हे काम महामेट्रोने मे.एचसीसी-अल्फा इन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. ही कंपनीला दिलेले आहे. या कंपनीकडून विविध विभागात शंभराहून अधिक कामगार काम करत आहेत. या कामगारांचे डिसेंबर २०१८ ते आजपर्यंत ५ महिन्यांचा पगार झालेला नाही. या कामगारांचे मासिक पगार थकीत असून त्यातील काही कामगारांना एक महिन्याचा पगार दिला आहे. तर काही कामगारांना दोन महिन्याचा पगार देऊन सक्तीने राजीनामे लिहून घेतले आहेत.
उर्वरित कामगारांना राजीनामा न देल्यास सक्तीने कामावरुन काढणार, अशा धमक्या देत आहे. दोन महिन्याचा पगार घेऊन राजीनामा दिल्यास उर्वरित दोन महिन्याचा पगार मिळण्याची कामगारांना शाश्वती नाही. त्यामुळे कामगारांची व त्यांच्या कुटुंबाची उपासमार होत आहे. कंपनीने बळजबरीने या सर्व कामगारांना निलंबित केले आहे. त्यामुळे या अन्यायाच्या विरोधात या कंपनीचे कामगार प्रभाकर माने, अभिजीत भास्करे, अरुण गायकवाड, अलिम तांबोळी, मोहन गायकवाड, आनंद कुमार, विनोद बिसेन हे सर्व कामगार वल्लभनगर एस टी स्टॅण्ड शेजारी मे.एचसीसी-अल्फराइन्फा प्रोजेक्ट प्रा. लि. या कंपनी कार्यलयासमोर बुधवार दि. १ मे २०१९ सकाळी १० वाजल्यापासून अमर उपोषणास बसले आहेत.
तसेच उर्वरित महिन्यांचा पगार मिळण्याची शाश्वती नाही. त्यामुळे या कामगारांच्या कुटूंबियांची उपासमार होत आहे. कामगारांनी काम बंद आंदोलन केले असताना काही कामगारांना निलंबित केले आहे. सदरची कंपनी, कंपनी कायद्याचा नियमभंग करीत असून कामगारांवर अन्याय करीत आहे.
एच.सी.सी. – अल्फराईन्फा प्रोजेक्टर प्रा. लि. जेव्ही या कंपनीवर कायदेशीर कारवाई करावी, या कंपनीमधील कामगारांचा थकीत पगार त्वरीत द्यावा, निलंबित केलेल्या कामगारांना परत कामावर घेण्यात यावे, याबाबत आपणांमार्फत योग्य ते आदेश निर्गत करण्यात यावेत, अशी मागणी साने यांनी केली आहे.