कांगोतील हिंसाचारात 20 ठार

बेनी – डेमोक्रॅटिक रिपब्लीक ऑफ कांगो या देशात नव्याने सुरू झालेल्या हिंसाचारात किमान 20 जण ठार झाल्याचे वृत्त आहे. एडीएफच्या गनिमांनी केलेल्या हिंसाचारात दहा जण ठार झाले . या गनिमांनी माबु गावात 10 नागरीकांना ठार मारले आहे असे वृत्त प्रशासनाकडून देण्यात आले. त्यानंतर उसळेल्या हिंसाचारात आणखी दहा जण ठार झाले आहेत.
एडीएफ गनिमांची ही संघटना इस्लामीक कट्टरपंथीयांच्या प्रभावाखालील संघटना आहे. या संघटनेने 90 च्या दशकापासून देशात हिंसाचाराचा धुमाकुळ घातला आहे. त्यांनी घडवलेल्या हिंसाचारात आत्ता पर्यंत शकडो लोक ठार झाले आहेत. त्या देशात शांततेसाठी तैनात करण्यात आलेल्या संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा पथकांवरही या संघटनेच्या गनिमांनी हल्ले चढवले आहेत. त्यात काही सुरक्षा जवान ठारही झाले आहेत. कालच या गनिमांनी किबीरीझी जिल्ह्यात केलेल्या हल्ल्यात दोन सुरक्षा जवान ठार झाले आहेत.