breaking-newsराष्ट्रिय
काँग्रेसला मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती- देवेगौडा

बंगळूरू : कर्नाटकमध्ये काँग्रेसला आम्ही मुख्यमंत्रिपदाची ऑफर दिली होती. पण त्यांनी ती नाकारली, असा गौप्यस्फोट जनता दल सेक्युलरचे (जेडीएस) अध्यक्ष आणि माजी पंतप्रधान एच. डी. देवेगौडा यांनी केला.
एका वृत्तवाहिनीशी बोलताना एच.डी.देवेगौडा यांनी हा गौप्यस्फोट केला. त्यामुळे काँग्रेसने भाजपला रोखण्यासाठी जेडीएसला मुख्यमंत्रिपदाचे आमिष दाखविल्याच्या चर्चांना पूर्णविराम मिळाला आहे. काँग्रेसनेच माझ्याशी संपर्क साधला होता. मी आघाडी करण्यास परवानगी दिली. त्यावेळी त्यांनी कुमारस्वामींना मुख्यमंत्री बनविण्याची इच्छा व्यक्त केली. पण आम्ही त्यांना त्यांचा मुख्यमंत्री बनविण्यास सांगितले होते. पण काँग्रेसने त्यास नकार दिला, असे देवेगौडा यांनी स्पष्ट केलं आहे.