breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र

काँग्रेसच्या विरोधी पक्षनेत्यांकडून भाजपच्या सुजय विखेंचा प्रचार

अहमदनगर, – काँग्रेसचे नेते आणि विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे हे भाजप उमेदवार आणि त्यांचे पुत्र सुजय विखे यांच्या बैठकीत उपस्थित राहिले आहेत. काँग्रेसने नुकतीच राधाकृष्ण विखे पाटील यांची स्टार प्रचारक म्हणून नियुक्ती केली होती. त्यामुळे या बैठकीतला फोटो व्हायरल होत आहे.

राधाकृष्ण विखे सुजय विखे यांचा प्रचार करत असल्याचे उघड झालं आहे. या बैठकीनंतर राधाकृष्ण विखे यांनी मात्र कुठलीही प्रतिक्रिया दिलेली नाही.

दरम्यान, ‘राधाकृष्ण विखे पाटील आणि विजयसिंह मोहिते पाटलांचा भाजपप्रवेश भाजपप्रवेश निश्चित झाला आहे. भाजपचे उमेदवार सुजय विखे यांच्या प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची अहमदनगर येथे 12 एप्रिल रोजी जाहीर सभा आहे. या सभेत राधाकृष्ण विखे पाटील मोदी यांच्या उपस्थितीत भाजप प्रवेश करणार आहेत,’ अशी माहिती आहे.

नगरमध्ये भाजप विरुध्द राष्ट्रवादी

सुजय पाटलांनी थेट भाजपचाच झेंडा हातात घेत या मतदारसंघात राष्ट्रवादीला आव्हान दिलं आहे. त्यामुळे आता राष्ट्रवादीनेही ही जागा प्रतिष्ठेची केली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसकडून आमदार संग्राम जगताप यांना नगरमधून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. नुकत्याच भाजपमध्ये प्रवेश केलेल्या सुजय विखे यांच्याविरोधात आता नगरमधून राष्ट्रवादीने तगडा उमेदवार रिंगणात उतरवला आहे. त्यामुळे आता नगरची लोकसभा निवडणूक मोठी रंगतदार असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button