breaking-newsपुणेमहाराष्ट्र

कल्याणीनगर येथे सात लाखाची घरफोडी

  • कल्याणीनगर येथे सात लाखाची घरफोडी

पुणे – कल्याणीनगर येथे बंद सदनिका फोडून 6 लाख 95 हजाराची चोरी करण्यात आली. याप्रकरणी अज्ञात व्यक्तीविरोधात येरवडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
फिर्यादी कुमार नाईक(24,रा.कल्याणीनगर) यांच्या हर्मेश पारस इमरतीत सदनिका आहे . ही सदनिका बंद असताना कुलूप उचकटून चोरटयांनी आत प्रवेश केला. यानंतर बेडरुमच्या कपाटातील सोन्या-चांदीचे 6 लाख 95 हजाराचे दागिने चोरण्यात आले. तसेच याच इमारतीतील आणखी एक सदनिका फोडण्यात आली. याप्रकरणी सहायक पोलीस निरीक्षक मोरे तपास करत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button