कर्नाटक ; मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करा-रोशन बेग

बंगळुरू : कर्नाटकातल्या सत्ता समीकरणाचा पेच दिवसेंदिवस वाढतच चाललाय. लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्री करा या वीरशैव महासभेच्या आग्रहानंतर आता मुस्लिम आमदाराला उपमुख्यमंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. काँग्रेसकडून 7 वेळा आमदार असलेल्या रोशन बेग यांना उपमुख्यमंत्री करा, अशी मागणी मुस्लिम संघटनांनी केली आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी कुमारस्वामी यांना सरकार बनवण्याचे निमंत्रण दिले आहे. दुसरीकडे मंत्रिमंडळातल्या उपमुख्यमंत्रिपदावरून वाद सुरू आहे. मुस्लिम संघटनांनी पत्रकार परिषद घेऊन ही मागणी केली आहे.
कालच लिंगायत नेत्याला उपमुख्यमंत्रिपद द्या, अशा आशयाचं पत्र अखिल भारतीय वीरशैव महासभेनं कुमारस्वामींना लिहिलं होतं. त्यामुळे नवा वादाला तोंड फुटलं असतानाच आता हिंदू महासभेच्या याचिकेमुळे कुमारस्वामी यांच्या शपथविधी सोहळ्यातील अडचणींमध्ये भर पडली आहे. बुधवारी रोजी कर्नाटकाच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ घेणार आहेत. कर्नाटकात एच. डी. कुमारस्वामी यांच्या नेतृत्वाखालील नव्या सरकारच्या सत्तावाटपाचा फॉर्म्युला जवळपास तयार झाला असून, त्यानुसार जनता दल (धर्मनिरपेक्ष)चे 13 मंत्री व काँग्रेसचे 20 मंत्री बुधवारी शपथ घेतील, हे निश्चित मानले जात आहे. शपथविधीनंतर आपण 24 तासांतच बहुमत सिद्ध करू, असा दावा कुमारस्वामी यांनी केला आहे. राज्यपाल वजुभाई वाला यांनी 15 दिवसांचा अवधी दिला आहे.