breaking-newsराष्ट्रिय
कर्नाटकात खातेवाटप तिढा सुटला…

- जेडी(एस)ला अर्थ, तर कॉग्रेसला गृह खाते
नवी दिल्ली-अखेर कर्नाटकमधील खातेवाटपाचा तिढा सुटला आहे. अनेक दिवसांच्या जोरदार वाटाघाटींनंतर जनता दल (एस) ला अर्थ, तर कॉंग्रेसला गृह खाते देण्याबाबत सहमती झाल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली आहे. इतर खात्यांच्या वाटपाबाबतही वाटाघाटी अंतिम टप्प्यात असल्याचे सांगण्यात आले आहे. 30 मे पासून खातेवाटपासंबंधे दोन्ही पक्षांच्या नेत्यांमध्ये वाटाघाटींच्या पाच फेऱ्या झाल्या आहेत.
कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी हे सध्या अमेरिकेत आहेत. सोनिया गांधी यांच्या वैद्यकीय तपासणीसाठी ते त्यांच्याबरोबर अमेरिकेला गेले असले, तरी त्यांनी अमेरिकेहून खातेवाटपासंबंधी कॉंग्रेस नेत्यांशी फोनवरून सल्लामसलत केल्याचे सूत्रांनी स्पष्ट केले आहे.