breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

कर्नाटकातील एका फ्लॅट मध्ये आढळली बोगस मतदार ओळखपत्रे

  • कॉंग्रेस व भाजपचे एकमेकांच्या विरोधात दावे 

बंगळुरू – कर्नाटकातील राजा राजेश्‍वरी नगर मतदार संघातील एका सदनिकेत हजारो बनावट मतदार ओळखपत्रे सापडल्यामुळे खळबळ उडाली आहे. या विषयावरून कॉंग्रेस व भाजप नेत्यांनी एकमेकांवर आरोप सुरू केले आहेत. त्या मतदार संघातील निवडणूक पुढे ढकलण्याची मागणी भारतीय जनता पक्षाने केली आहे. या संबंधात बोलताना केंद्रीय मंत्री व भाजपचे नेते प्रकाश जावडेकर यांनी असा आरोप केला आहे की कर्नाटकातील कॉंग्रेसचे आमदार मुनीरथना नायडू यांच्या मार्फतच हे बोगस मतदार ओळखपत्रांचे रॅकेट चालवले जात आहे.

काल पोलिसांना तेथील एका छाप्यात अशी असंख्य बनावट पोलिस ओळखपत्रे सापडली आहेत. ही कॉंग्रसचीच फिलॉसॉफी आहे. तुम्हाला मतदार मतदान करणार नाहीत अशी खात्री पटली की कॉंग्रेसचे लोक अशा बनावट मार्गाचा वापर करतात असा आरोप त्यांनी केला. या प्रकरणाच्या सखोल चौकशीची मागणीही त्यांनी केली आहे. हा फ्लॅट मंजुळा नावच्या महिलेचा आहे तिला ताबडतोब अटक करण्याची मागणीही त्यांनी केली आहे. दरम्यान ज्या मंजुळा नावाच्या महिलेच्या फ्लॅट मध्ये ही ओळखपत्रे सापडली ती स्वताच भाजपची कार्यकर्ती असून तिच्या मुलाने गेल्यावेळी भाजपच्या तिकीटावर महापालिकेची निवडणूक लढवली आहे असा दावा ज्येष्ठ कॉंग्रेस नेते आनंद शर्मा यांनी केला आहे.

आपली पोलखोल झाल्याने भाजपने उलट्या बोंबा मारायला सुरूवात केली आहे असा आरोपही त्यांनी केला आहे. या प्रकरणी निवडणूक आयोगाने त्वरीत दखल घेऊन संबंधीतांवर कठोर कारवाई केली आहे. पराभव समोर दिसू लागल्याने भाजपने आपले जुने हतखंडे आता वापरायला सुरूवात केली आहे असा आरोपही त्यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button