breaking-newsराष्ट्रिय

कर्नाटकमध्ये कॉंग्रेसच्या विरोधात जनाधार

नवी दिल्ली – कर्नाटक विधानसभेच्या निवडणूकीमध्ये जनमत कॉंग्रेसच्या विरोधात नोंदवले गेले होते. मात्र कॉंग्रेस पक्षाने आपला पराभव हा विजय असल्याचे भासवायची नवीन रित शोधून काढली आहे, अशी टीका भाजप अध्यक्ष अमित शहा यांनी आज केली. कर्नाटकच्या निवडणूकीमध्ये बहुतेक सर्व मंत्र्यांचा पराभव झालेला असतानाही कॉंग्रेस आनंदोत्सव साजरा का करत आहे, याचे उत्तर कॉंग्रेसने जनतेला द्यावे, अशी मागणीही शहा यांनी केली.

कर्नाटकमध्ये केवळ कॉंग्रेस आणि धर्मनिरपेक्ष जनता दलच आनंद साजरा करत आहे. कर्नाटकातील जनता आनंद साजरा करत नाही आहे. कारण कर्नाटकाच्या जनतेने दिलेले जनमत हे कॉंग्रेसच्या विरोधातील आहे. यामध्ये कोणताही गैरसमज असण्याचे कारण नाही. जर आम्ही (भाजपने) सरकार स्थापण्यासाठी दावा केला नसता, तर ते जनतेच्या जनमताच्या विरोधात झाले असते, असे ते म्हणाले.

आपल्या पराभवालाच विजय भासवण्याचे नवीन तंत्र कॉंग्रेसला सापडले आहे. ही विजयाची नवीन व्याख्या 2019 च्या निवडणूकीपर्यंत कायम राहिली, तर त्याचा भाजपला फायदाच होईल, असे ते म्हणाले. कॉंग्रेसने आता सर्वोच्च न्यायालय, निवडणूक आयोगासारख्या घटनात्मक संस्थांबरोबर मतदान यंत्रांवरही विश्‍वासदाखवायला सुरुवात केली आहे. मात्र जेंव्हा निवडणूकीत कॉंग्रेसचा पराभव होत होता, तेंव्हा निवडणूक आयोग आणि सर्वोच्च न्यायालयाच्या कार्यपद्धतीवर कॉंग्रेसकडून टीका केली जात होती, असेही शहा म्हणाले.

बी.एस. येडियुरप्पा यांनी बहुमत सिद्ध करण्यासाठी राज्यपालांकडे सात दिवसांची मुदत मागितल्याचे कॉंग्रेसच्या वकिलांकडून सर्वोच्च न्यायालयात खोटे सांगितल्याची टीकाही शहा यांनी केली.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button