कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी कुमारस्वामीच विराजमान होणार ?
बंगळुरु : जेडीएसचे नेते एच. डी. कुमारस्वामी यांचा कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडियुरप्पा यांनी पदाचा राजीनामा दिला.
कर्नाटकचे राज्यपाल वजूभाई वाला यांनी जेडीएसला सत्तास्थापनेसाठी आमंत्रण दिल्यास कुमारस्वामी काँग्रेसच्या पाठिंब्याने कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची सूत्रं हाती घेतील. मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर अवघ्या 55 तासात कर्नाटकातील भाजपचं सरकार पडलं. बहुमत सिद्ध करण्यापूर्वीच मुख्यमंत्री बी एस येडीयुरप्पा यांनी राजीनामा दिला. त्यामुळे कर्नाटकात आता काँग्रेस आणि जेडीएसचं सरकार सत्तेवर येणार आहे.
जनता दल सेक्युलरचे नेते कुमारस्वामी हे नवे मुख्यमंत्री होणार हे आता जवळपास निश्चित झाले आहे. येडियुरप्पा यांनी 17 मे म्हणजेच गुरुवारी सकाळी पद आणि गोपनियतेची शपथ घेतली होती.