breaking-newsआंतरराष्टीय

करातीचील 24 ख्रिश्‍चन युवकांचे अपहरण

कराची – कराचीतील 24 ख्रिश्‍चन युवकांचे काही अज्ञात व्यक्तींकडून अपहरण करण्यात आल्याचे वृत्त आहे. येथील अल्पसंख्य ख्रिश्‍चन समाजाच्या नेत्यांनी सांगितले की काही बुरखाधारी संशयास्पद व्यक्तींनी या युवकांचे अपहरण केले आहे. गेल्या मार्च 30 पासून ते बेपत्ता आहेत त्यांचा काहींच ठावठिकाणा लागला नाही.

अधिकाऱ्यांनी आणि तपास यंत्रणांनीही त्यांचे हे प्रकरण गांभीर्याने घेतलेले नाही. या युवकांचे वेगवेळ्या काळात अपहरण झाले आहे. 15 एप्रिलला चार युवकांचे तर 8 मार्च रोजी 14 युवकांचे अपहरण करण्यात आले आहे. त्यांना ज्यांनी पळवून नेले आहे त्यांनी आपण पोलिस अधिकारी असल्याचे भासवले आणि त्यांनी या युवकांना आपल्याबरोबर जाण्यास भाग पाडले आहे. ते जर बरोबर आले नाहीत तर एन्काऊंटर करण्याची धमकी त्यांनी दिली होती, त्यामुळे हे युवक त्यांच्या बरोबर गेले. काहींना जबरदस्तीने धरून नेण्यात आले.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button