breaking-newsराष्ट्रिय

करवा चौथच्या दिवशी बायकोच्या कुटुंबियांकडून मारहाण, नवऱ्याची आत्महत्या

करवा चौथच्याच दिवशी पत्नीच्या कुटुंबियांकडून मारहाण झाल्यामुळे हताश झालेल्या २६ वर्षीय पतीने गळफास घेऊन आत्महत्या केली. लखनऊच्या कृष्णनगरमध्ये शनिवारी रात्री ही घटना घडली. मोहित रावत असे मृताचे नाव असून तो टूर कंपनीत नोकरीला होता. मोहितची आई सावित्रीने सासरकडच्या मंडळींवर हत्येचा आरोप करुन तक्रार दाखल केली आहे.

मोहित पत्नी प्रिती आणि आई-वडिलांसह बांदीखेडा भागात रहात होता. मोहित बरोबर वाद झाल्यानंतर पत्नीने मोबाइलवरुन त्याला संदेश पाठवला व ती तिच्या आई-वडिलांच्या घरी निघून गेली. मोहितने तिला थांबवण्याचा भरपूर प्रयत्न केला पण ती ऐकली नाही. शनिवारी रात्री मोहित तिला परत आणण्यासाठी आशियाना या तिच्या निवासस्थानी गेला.

रात्री एकच्या सुमारास मोहित एकटाच घरी परतला. त्यावेळी प्रिती त्याच्यासोबत नव्हती. प्रितीचा भाऊ आणि तिचे आई-वडिल तिला माझ्यासोबत राहू देणार नाहीत. त्यांनी आपल्याला मारहाण केली असे रोहितने त्याच्या कुटुंबियांना सांगितले. त्यानंतर तो झोपायला निघून गेला. दुसऱ्या दिवशी रविवारी तो खोलीतून बाहेर पडला नाही म्हणून दरवाजा तोडून आत प्रवेश केला तेव्हा मोहित गळफास घेतलेल्या अवस्थेत होता असे सावित्री यांनी पोलिसांना सांगितले. माझ्या मुलाची त्याची बायको आणि तिच्या कुटुंबियांनी हत्या केली आहे असा आरोप सावित्री यांनी केला.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button