breaking-newsताज्या घडामोडीपुणे
करदात्यांच्या पैशांचा अपव्यय रोखणार
आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पदाधिका-यांना सुचना
पिंपरी- भारतीय जनता पार्टीचे शहराध्यक्ष तथा आमदार लक्ष्मण जगताप यांनी महापालिकेतील सत्ताधारी पदाधिका-यांना अनावश्यक खर्च करु नका, अशा सुचना दिल्या आहेत. त्यानूसार
महापालिकेच्या वतीने विविध मान्यवरांच्या सत्कारासाठी यापुढे पालिकेकडून बुके, फुले, शाल, श्रीफळ देणे बंद करण्यात येणार आहे. त्याएेवजी झाडांचे रोप, पुस्तक देऊन सन्मान करण्यात येणार आहे. तसेच महापालिकेची दैनदिनी डायरी बंद करुन छोटी पॉकेट छापण्यात येणार आहे, यामुळे अनावश्यक खर्च कमी करण्यात निश्चित मदत होणार आहे, अशी माहिती स्थायी समितीचे सदस्य विलास मडिगेरी यांनी दिली. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.
यावेळी विलास मडिगेरी म्हणाले, ” महापालिकेच्या वतीने विविध समारंभ, मान्यवरांचे, खेळाडूंचे सत्कारासाठी बुके, फुले, शाल, श्रीफळाचा वापर करण्यात येत होता. स्थायी समितीच्या सभेत वृक्ष संवर्धन प्राधिकरण समितीने अधिकारी व सदस्यांचा नियोजित सिक्कीम दौरा रद्द करुन महापालिकेचे 10 लाख रुपयांची बचत केली आहे. तसेच महापालिकेकडून दरवर्षी विविध सत्कार समारंभ घेण्यात येतात. त्या कार्यक्रमातील हार, पुष्पगुच्छ, बुके यावर साधारणपणे वर्षभरात सुमारे 24 लाख खर्च होतो. तो ठराव रद्द करुन यापुढे सत्कार समारंभात मान्यवरांना एक रोपटे किंवा पुस्तक भेट देण्याचा ठराव मंजूर करण्यात आला आहे. याशिवाय महापालिकेची दरवर्षी दैनंदिन डायरी छापण्यात येते. त्या डायरीवर दरवर्षी सुमारे 10 लाख रुपये खर्च होतो. त्यामुळे पुढील वर्षांपासून मोठी डायरी न छापती पॉकेट डायरी छापण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. तसेच दरवर्षी एक डायरी 103 रुपयाला छापली जाते. त्यानुसार आठ हजार डाय-या छापण्यासाठी दहा लाख रुपये खर्च येतो. त्यामुळे यापुढे मोठ्या आकाराची डायरी छापण्यात येऊ नये. त्याऐवजी छोटी (पॉकेट) डायरी छापण्यात यावी, असा ठराव करण्यात आला आहे. असेही मडिगेरी यांनी सांगितले.