breaking-newsआंतरराष्टीयताज्या घडामोडीमुंबईराष्ट्रिय

कठुआ बलात्कार : बीजेपी – पीडीपी गुन्हेगार ; मुफ्तींच्या भावाचा खळबळजनक आरोप

श्रीनगर : कठुआ येथील आठ वर्षीय मुलीवर सामुहिक बलात्कार प्रकरणानंतर मुख्यमंत्री मेहबुबा मुफ्ती यांच्या भावाने पीपल्स डेमोक्रेटिक पार्टी(PDP)  आणि भाजप गुन्हेगार असल्याचे म्हटले आहे. या दोन पक्षांमुळेच काश्मीरला रक्ताची किंमत मोजावी लागेल. तसेच हे माझे वैयक्तिक मत नसून PDP पक्षातील अनेकजण असाच विचर करत असल्याचे तसाद्दुक मुफ्ती यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना सांगितले.

बलात्कारानंतर निरागस मुलीची अत्यंत क्रूरपणे हत्या करण्यात आली. यानंतर राज्यात धर्माचे राजकारण खालच्या पातळीवर पोहचले आहे. हे खुपच लाजिरवाणे, अपमानास्पद आहे. जर युतीचे सरकार म्हणजे अपयश आणि अपमान असेल तर मी अशा परिस्थितीत अस्वस्थता लपवू शकत नसल्याचे तसादुक मुफ्ती यांनी म्हटले आहे. केंद्र सरकारने आपला हट्टी स्वभाव सोडावा. खऱ्या प्रश्नांवर लक्ष द्यावे. राज्यातील तणावपूर्ण वातावरणावर नियत्रण कसे मिळवता येईल यासाठी प्रयत्न करावे, असे म्हणत त्यांनी सरकारला लक्ष्य केले.

तसाद्दुक जम्मू-काश्मीरचे पर्यटन मंत्री आहेत. त्यांच्या या वक्तव्यामुळे राज्यसरकारच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. ते म्हणाले की, सरकारचे नियंत्रण असूनही लोकांचा विश्वास नाही. राज्याच्या विकासासाठी , परिस्थिती सुधारण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत पण दिलेली आश्वासने पूर्ण करता आली नाहीत. राज्यातील अपराधांमध्ये आम्हीही सहभागी आहोत. त्याची किंमत आम्हाला मोजावी लागेल, असे त्यांनी म्हटले आहे.

बलात्कार पीडितेच्या अंत्यसंस्काराला जागा नाही

कठुआ सामुहिक बलात्कार प्रकरणातील पीडितेला दफन करण्यासाठी जागा उपलब्ध नाही. पीडितेचा समाज आणि हिंदूंमध्ये असलेल्या वादातून तिच्या दफनविधीसाठी हिंदू जागा देत नसल्याचा आरोप पिडित मुलीच्या कुटुंबियांनी केला आहे. तसेच समाजातील लोकांना सतत अपमानास्पद वागणूक हिंदूंकडून देत असल्याचे समाजाने म्हटले आहे.

बलात्कार पीडित मुलीचा मृतदेह मिळाल्यानंत दफनविधीसाठी जागा देण्यास नकार दिला होता. तेव्हा बराच वेळ वाट पाहून मृतदेह दुसऱ्या ठिकाणी  दफन केला. यामध्येही त्यांनी मुद्दाम आम्हाला ताटकळत ठेवून दफनविधी करायला भाग पाडले. तसेच मृत्यूनंतरही तिला अन्यायाची वागणूक दिली असल्याचे कुटुंबियांनी म्हटले आहे.

पीडितेच्या वकिलांना धमकी

कठुआ बलात्कार प्रकरणात पीडितेकडून वकिल दीपिका सिंह राजवत न्यायालयात लढणार आहेत. पण ही केस लढू नये यासाठी त्यांना अज्ञातांकडून धमकी देण्यात येत आहे. यावर वकिल दीपिका यांनी म्हटले की, काहीही झाले तरी ही केस शेवटपर्यंत लढेन, यामध्ये कोणताही दबाव न घेता तिला न्याय मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

जम्मू काश्मीरच्या महिला आयोगाच्या अध्यक्ष नईमा महजूर यांनी या प्रकरणाला राजकीय रंग देऊ नये असे म्हटले आहे. सध्या पीडित मुलीला न्याय देण्याला प्राधान्य असायला हवे. यासाठी गुन्हे अन्वेषण विभाग चांगल्या रितीने काम करत असल्याचे त्यांनी म्हटले आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button