breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कच-याच्या निविदेवरुन स्थायी समितीत भाजपचे दोन गट

पिंपरी- कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रिया स्थायी समितीने रद्द केल्या. त्या निविदा प्रक्रियेला राज्य शासनाने ‘क्लीनचिट’  दिली. त्यानंतर तो अहवाल महापालिका आयुक्तांनी स्थायी समितीसमोर ठेवला. परंतू, कचरा निविदेचा अहवाल स्थायी समितीने फेटाळला आहे. यामुळे सत्ताधारी भाजपच्या स्थायी समितीत दोन गट पडले आहेत. कच-याची निविदा रद्द करताना आम्हाला विचारले होते ? असा सवाल करीत तुम्ही काही केले तरी आम्हाला काही समजत नाही, असे समजू नका, असा इशारा नगरसेवक विकास डोळस यांनी स्थायी समितीच्या पदाधिका-यांना दिला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी ममता गायकवाड होत्या.

स्थायी समितीच्या सभेत कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेल्या निविदा प्रक्रियेचा राज्य शासनाने दिलेला ‘क्लिन’चिटचा अहवाल ठेवला होता. हा अहवाल स्थायी समितीने  फेटाळला आहे. परंतू, अहवाल फेटाळण्यावरुन स्थायी समितीत सदस्यामध्ये दोन गट पडले आहेत. यावेळी हा अहवाल महासभेसमोर ठेवण्यात यावा, अशी मागणी करीत  महासभा जो निर्णय घेईल, तो अंतिम करावा, अशी मागणी आमदार महेश लांडगे समर्थकांनी केली. परंतु, राज्य शासनाच्या कचरा संकलन व कचरा वहनच्या क्लिनचिटचा अहवाल स्थायी समिती पदाधिका-यांनी फेटाळला आहे.

नगरसेवक विकास डोळस म्हणाले, ” कचरा संकलन व कचरा वहन कामासाठी काढलेली निविदा रद्द करण्याचा निर्णय अचानक घेण्यात आला. त्याची चौकशी सुरु असताना हा निर्णय रद्द केला. त्या निविदा प्रक्रियेची मुख्यमंत्र्यांच्या आदेशानुसार राज्य सरकारने चौकशी केली आहे. ती निविदा प्रक्रिया योग्य आहे. त्यामुळे पालिकेचे कोणतेही आर्थिक नुकसान होणार नाही. त्यामुळे हा अहवाल महासभेसमोर सादर करण्याची आम्ही मागणी केली होती. परंतु, काही सदस्य एकाकी कारभार करत आहेत. ऐनवेळी कोणतेही विषय आणले जातात,  त्याला मान्यता घेतली जाते. आम्ही नवीन आहोत, म्हणून काय कळत नाही, असे त्यांनी समजू नये, स्थायी समितीत एकाकी कारभार चालू देणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला आहे. दरम्यान, कचरा निविदा रद्द करण्यावरुन सत्ताधारी भाजप समर्थकांमध्ये उघड दोन गट पडले आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button