breaking-newsताज्या घडामोडीपुणे

कचऱ्याशी दोन हात; त्याला “निसर्गलक्ष्मी’ची साथ

 

 

 • ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा सिम्बॉयसिस महाविद्यालया उपक्रम
 • उरलेल्या अन्नातून शालेय विद्यार्थ्यांनीही साकारले खत

पुणे – सध्या कचऱ्याची समस्या प्रचंड वाढली आहे. विशेषत: घर, खानवळी, हॉटेल्समध्ये साचणारा ओला कचरा हा प्रत्येकासाठी डोकेदुखी ठरतोय. उरलेले अन्न, भाज्यांची देठे, फळांच्या साल, बिया या गोष्टी इतर कचऱ्यासोबत फेकले जाते. मात्र, पर्यावरणासाठी हे हानिकारक ठरत आहे. यावर उपाय म्हणून सिम्बॉयसिस महाविद्यालयाच्या पर्यावरण विभागाने “निसर्गलक्ष्मी’ हा एक अनोखा अविष्कार तयार केला आहे.

घर, व्यावसायिक ठिकाणी अथवा एखाद्या संस्थेमध्ये तयार झालेल्या ओल्या कचऱ्याचे अतिशय सोप्या पद्धतीने विघटन करून त्यापासून खत बनविता येते. कोकोपिट आणि विविध प्रकारच्या सुमारे 12 जीवाणूंचे विरजणाचे मिश्रण असलेली एक कचऱ्याची बादली साकारण्यात आली आहे. याच बादलीला “निसर्गलक्ष्मी’ असे नाव संस्थेने दिले आहे.

कचरा हा शब्द पृथ्वीच्या शब्दकोशात नाही. तो मानवनिर्मित आहे, जी गोष्ट आपल्याला आवश्‍यक नसते, त्याला आपण कचरा म्हणतो. मात्र, आपण कचरा मानत असलेल्या बहुतांश वस्तू पुनर्चक्रीकरणाद्वारे पुन्हा वापरात आणणे सहज शक्‍य असते. याच तत्वाचा आधार घेत, घरातील ओला कचरादेखील पुनर्वापराखाली आणण्याचा प्रयत्न आम्ही या माध्यमातून करत आहे. – शरद काळे, पर्यावरण विभागप्रमुख, सिम्बॉयसिस महाविद्यालय.

शहरात जमा होणाऱ्या कचऱ्यापैकी सुमारे 40 टक्के कचरा हा ओला असतो. विविध घटकांमध्ये मिश्रित झालेला हा कचरा, कचरा डेपोपर्यंत पोहचेपर्यंत त्याची स्थिती अतिशय खराब झालेली असते. अशावेळी हा कचरा वेगळा करणेदेखील अवघड बनते. मात्र, ओला कचरा हा निर्माण होणाऱ्या ठिकाणीच विघटित करण्यात आला, तर कचऱ्याची समस्या कमी होण्यास मदत मिळेल, असे विभाग प्रमुख शरद काळे म्हणाले.

यासाठी “निसर्गलक्ष्मी’ची निर्मिती करण्यात आली आहे. वैयक्तिक, व्यावसायिक आणि संस्था/संघटनात्मक पातळी अशा तिन्ही स्तरांवर हा उपक्रम राबविला जाऊ शकतो. मोठ्या प्रमाणात हा उपक्रम राबविला गेल्यास यातून मिळणारा फायदादेखील तितकाच मोठा असेल. कचरा व्यवस्थापनाची गरज लक्षात घेता, तसेच शालेय वयातच मुलांमध्ये कचरा व्यवस्थापनाची सवय लागावी, यासाठी संस्थेच्या प्रभात रस्ता येथील प्रशालेत विद्यार्थ्यांच्याच हस्ते “मिड-डे मील’ मधील उर्वरीत अन्नाची प्रक्रिया करण्याचे प्रकल्प यशस्वीपणे राबविण्यात आला आहे. शहरातील इतर शाळा, सोसायट्या, व्यावसायिक ठिकाणे यांच्यापर्यंत पोहचण्याचा आमचा मानस आहे. त्यासाठी नागरिकांनीदेखील सहकार्य करावे, असे आवाहन काळे यांनी केले.

 • नेमका काय आहे “निसर्गलक्ष्मी’?
  – घरातील ओला कचरा विघटनासाठी उपयुक्त
  – उरलेले अन्न, भाज्यांच्या देठे, फळांच्या साल, बियांवर प्रक्रिया
  – कोकोपिट आणि जीवाणू विरजणाच्या सहाय्याने ओला कचऱ्याचे विघटन
  – सेंद्रीय खताची निर्मिती. ओल्या कचऱ्यापासून खत तयार करण्याचा सिम्बॉयसिस महाविद्यालया उपक्रम
  उरलेल्या अन्नातून शालेय विद्यार्थ्यांनीही साकारले खत
Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button