breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

कचऱ्याची विल्हेवाट न लावणाऱ्या २१ सोसायटय़ांना दंड

अंधेरी पश्चिमेकडे महापालिकेची कारवाई; आणखी ११९ सोसायटय़ांवर कारवाईची शक्यता

मुंबईतील मोठय़ा गृहनिर्माण संकुलांमध्ये निर्माण होणाऱ्या कचऱ्याचे वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक आहे; परंतु महापालिकेच्या वतीने वारंवार नोटीस बजावूनही गृहनिर्माण संकुलांमध्ये याची अंमलबजावणी केली जात नसल्याने प्रशासनाने आता कारवाईचा बडगा उगारला आहे. अंधेरी पश्चिममधील तब्बल २१ गृहनिर्माण संकुलांवर दोन लाख रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली आहे.

दररोज १०० किलोहून अधिक कचरा निर्माण होणाऱ्या गृहनिर्माण संस्थांना कचरा वर्गीकरण करून त्याची विल्हेवाट स्वत:च लावणे बंधनकारक करून त्या गृहनिर्माण संकुलातील कचरा महापालिकेच्या वतीने न उचलण्याचा निर्णय मागील वर्षी २ ऑक्टोबरला घेण्यात आला होता. त्यानंतर गृहनिर्माण संस्थांना कचऱ्याची विल्हेवाट लावणे बंधनकारक करण्यात आले आहे. मात्र अंधेरीतील बहुतेक संस्थांकडून कचऱ्याची विल्हेवाट लावली जात नसल्याने त्यांना नोटीस बजावून दंडात्मक कारवाई करण्यासाठी न्यायालयात दावे करण्यात आले होते. त्यातील २१ संस्थांना न्यायालयाने २ लाख दोन हजार रुपयांचा दंड ठोठावला आहे.

अंधेरी-जोगेश्वरी पश्चिम भागातील एकूण १४० गृहनिर्माण संस्थांना कचऱ्याचे वर्गीकरण न करणे, खतनिर्मिती प्रकल्प न राबवणे, तसेच कचऱ्याची विल्हेवाट न लावणे या प्रकरणी नोटीस बजावण्यात आली आहे. न्यायालयात पुढील कार्यवाहीसाठी दावे दाखल करण्यात आले होते. त्यातील २१ गृहनिर्माण संस्थांचे दावे निकालात निघाले असून त्यांना २ लाखांचा दंड आकारण्यात आल असल्याचे के/पश्चिम विभागाचे सहायक आयुक्त प्रशांत गायकवाड यांनी सांगितले. तर उर्वरित ११९ प्रकरणे न्यायालयात प्रलंबित असल्याचेही त्यांनी सांगितले.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button