breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

कँटोन्मेंटनंतर आता शहरातील लष्कर हद्दीतले रस्ते खुले करावेत – लक्ष्मण जगताप

संरक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना दिले मागणीचे निवेदन

पिंपरी – कँटोन्मेंट हद्दील लष्कर छावणीतील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश केंद्र सरकारने दिले आहेत. त्याचधर्तीवर महापालिका हद्दीतील बोपखेल, पिंपळे सौदागर येथील बंद रस्ते खुले करण्यात यावेत, अशी मागणी भाजपचे शहराध्यक्ष आमदार लक्ष्मण जगताप यांनी संरक्षणमंत्र्यांकडे केली आहे.

सरंक्षण मंत्री निर्मला सीतारामन यांना जगताप यांनी निवेदन दिले आहे. त्यात म्हटले आहे की, नुकतेच संरक्षण विभागाने कँटोन्मेंटमधील बंद रस्ते तातडीने खुले करण्याचे आदेश दिले आहेत. संरक्षणमंत्री निर्मला सीतारामन यांनी देशभरातील कँटोन्मेंटच्या प्रलंबित प्रश्नांबाबत नुकतीच बैठक घेतली. त्यानंतर काही दिवसांतच कँटोन्मेंटमधील बंद रस्ते खुले करण्याचे आदेश त्यांनी जारी केले आहेत.

त्यानुसार स्थानिक लष्करी प्रशासनाने मंगळवारी सकाळी पुणे कँटोन्मेंटच्या हद्दीतील वानवडी बाजारातील राइट फ्लँक रस्ता आणि घोरपडीतील एलाइट लाइन्स रस्ता नागरिकांसाठी खुला केला आहे. याच निकषावर बोपखेल येथील रस्ता व पिंपळे सौदागर येथील रक्षक सोसायटी ते कुंजीरवस्ती रस्ता नागरिकांना खुला करण्यात यावा, अशी मागणी आमदार जगताप यांनी निवेदनाव्दारे केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button