breaking-newsताज्या घडामोडीमहाराष्ट्र
औरंगाबादेत मोबाईल बॅटरी स्फोट, दोन भावंडे जखमी

औरंगाबाद – मोबाईल बॅटरीचा स्फोट होऊन दोन भावंडे जखमी झाल्याची घटना औरंगाबादेत घडली. मोबाईल बॅटरी बाहेर काढून तिच्यासोबत खेळत असताना, बॅटरीचा स्फोट झाला.
यामध्ये कृष्णा रामेश्वर जाधव (8) आणि कार्तिक रामेश्वर जाधव (5) अशा जखमी भावंडांची नावे आहेत. ही घटना आज सकाळी 9 च्या सुमारास शिऊर येथील घोडके वस्तीत घडली.
या स्फोटात दोन्हीही बालकांच्या हाताला गंभीर इजा झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील शासकीय महाविद्यालयीतल (घाटी) रुग्णालयात उपचार सुरु आहे. दोन्ही भावंडे मोबाईलशी खेळत असतांना हा प्रकार घडला. मोबाईल कोणत्या कंपनीचा होता, स्फोट कसा झाला याबाबत माहिती समोर आली नाही. मात्र मोबाईल बॅटरीच्या स्फोटाच्या घटना वारंवार घडत असून, भिती निर्माण झाली आहे. यापूर्वीही विविध ठिकाणी मोबाईल चार्जिंगला लावल्यामुळे स्फोट झाले आहेत.