breaking-newsमनोरंजन

ओमेर्टाला बहारीनमध्ये सेन्सॉरने सर्टिफिकेट नाकारले

हंसल मेहता दिग्दर्शित “ओमेर्टा’ला बहारीनमधील सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे. या सिनेमामध्ये एकाच धर्मासंदर्भातील कथा असल्याने बहारीनच्या सेन्सॉर बोर्डाने प्रमाणपत्र देण्यास नकार दिला आहे, असे सूत्रांनी सांगितले. यापूर्वी “ओमेर्टा’ला संयुक्‍त अरब अमिरातीमध्येही काही समस्यांचा सामना करावा लागला होता. मात्र तेथील समस्या आता सोडवल्या आल्या असून तिथे हा सिनेमा सामान्यपणे रिलीज होणार आहे. भारतातही “ओमेर्टा’तील काही न्यूड सीनबाबत सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतले आणि हे सीन काढायला लावले आहेत.

दहशतवाद्याच्या मानसिकतेवर प्रकाश टाकण्यासाठी हे सीन आवश्‍यक होते, असे हंसल मेहताचे म्हणणे होते. “ओमेर्टा’ हा सिनेमा मूळ पाकिस्तानी वंशाचा ब्रिटीश दहशतवादी अहमद उमर सईद शेखच्या जीवनावर आधारीत आहे. भारतात आणि लंडनमध्ये शुटिंग झालेल्या या सिनेमाची कथा दहशतवादी हल्ल्यांच्या आजूबाजूला फिरते. यात 9/11, 26/11 आणि अमेरिकेचा पत्रकार डॅनिएल पर्लच्या शिरच्छेदासारख्या घटनांचे संदर्भ आहेत. “ओमेर्टा’ला अनेक आंतरराष्ट्रीय पुरस्कार मिळाले आहेत आणि टोरांटोच्या फिल्म फेस्टिव्हलमध्येही हा सिनेमा दाखवला गेला होता. स्वीस एन्टरटेनमेंटच्या बॅनरखाली बनलेल्या या सिनेमाची निर्मिती नाहिद खाननी केली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button