Views:
620
न्यूयॉर्क – ऑस्कर पुरस्कार प्राप्त कॅनेडिअन अभिनेते ख्रिस्तोफर प्लमर यांचे वयाच्या ९१ व्या वर्षी निधन झाले आहे. कनेक्टिकटमधील राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. प्लमर यांना एक ऑस्कर पुरस्कार, दोन टोनी पुरस्कार आणि दोन एमी पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. प्लमर यांनी सिनेमाच्या इतिहासातील सर्वोत्कृष्ट संगीत फिल्म ‘द साउंड ऑफ म्युझिक’ यात काम केले आहे.
ख्रिस्तोफर प्लमरचे जिवलग मित्र आणि मॅनेजन लू पिट म्हणाले की, प्लमरच्या आयुष्याच्या शेवटच्या क्षणांमध्ये त्यांची 51 वर्षीय पत्नी एलेन टेलर त्याच्यासमवेत उपस्थित होती. पिटच्या म्हणण्यानुसार, ख्रिस्तोफर हे एक असामान्य व्यक्ती होते. ज्यांना त्यांचं काम खूप आवडत होते आणि ते त्याचा आदर करायचे.
‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी ऑस्कर
ख्रिस्तोफर प्लमर यांना अजूनही ‘द साउंड ऑफ म्युझिक’ सिनेमातील कॅप्टन जॉर्ज वॉन ट्रॅपच्या भूमिकेत प्रेक्षक पसंत करतात. ख्रिस्तोफर यांनी आपल्या 70 वर्षांच्या कारकीर्दीत हॉलिवूड फिल्म जगतात अनेक भूमिका केल्या. ज्यामध्ये त्यांना 2012 मध्ये ‘बिगिनर्स’ चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा ऑस्कर पुरस्कार देण्यात आला.
शेक्सपियरच्या कथेतील अनेक पात्रे निभावली
ऑस्कर पुरस्कार त्यांना वयाच्या 82 व्या वर्षी मिळाला. ‘बिगिनर्स’ चित्रपटात त्यांनी एक अशी भूमिका साकारली की ज्याला बर्याच वर्षानंतर वाटतं की आपण गे आहोत. याशिवाय त्यांनी शेक्सपियरने लिहिलेली अनेक पात्रे पडद्यावर उतरवली आहेत. तसेच टॉल्सटॉयच्या ‘द लास्ट स्टेशन’मध्ये त्यांच्या भूमिकेने सर्वांनाच भुरळ पडली होती.
Like this:
Like Loading...