breaking-newsमनोरंजन

ऐश्‍वर्या रायपण येणार इन्स्टाग्रामवर

सोशल मिडीयापासून नेहमीच दूर राहणारी ऐश्‍वर्या राय बच्चनही आता स्वतःचे इन्स्टाग्राम अकाउंट उघडणार आहे. आपल्या फॅन्सशी कनेक्‍टेड राहण्यासाठी आणि शुभेच्छांचा स्वीकार करण्यासाठीच ऐश्‍वर्याने इन्स्टाग्रामवर सक्रिय होण्याचा निर्णय घेतला आहे.

ऐश्‍वर्याने ट्‌विटर किंवा इन्स्टाग्रामवर ऍक्‍टिव्ह व्हावे, अशी तिच्या फॅन्सची जोरदार मागणी होती. इतके दिवस ऐश्‍वर्या ते टाळत होती. पण आता तिलाही त्याची आवश्‍यकता असल्याचे पटले आहे. जगप्रसिद्ध कान फिल्म फेस्टिव्हलमध्येही ऐश्‍वर्या जाणार आहे. कानमध्ये तिचा लुक काय असेल, याबाबत गॉसिप मिडीयाला नेहमीच उत्सुकता असते. अशा आंतरराष्ट्रीय इव्हेन्टमध्ये सहभागी होणाऱ्या सेलिब्रिटीबाबतच्या खुसखुशीत गप्पा मिडीयावाल्यांना शेअर करायला हव्याच असतात.

अशाबाबतीत कोणत्याही गैर अर्थाच्या बातम्या प्रस्तुत होऊ नये यासाठी स्वतःची भूमिका पब्लिक प्लॅटफॉर्मवर मांडणे आवश्‍यकत असते. म्हणूनच ऐश्‍वर्याने इन्स्टाग्रामची निवड केली आहे. अनेकवेळा बच्चन कुटुंबियांशी संबंधित घडामोडींबाबत स्वतः बिग बी आणि अभिषेक आपल्या ट्विटर अकाउंटवरून स्पष्टिकरण देत असतात. मात्र आता ही जबाबदारी ऐश्‍वर्यानेही सांभाळायची असे ठरवले आहे. ऐश्‍वर्याचा “फन्ने खान’ हा आगामी सिनेमा आहे. त्याशिवाय तिच्या अन्य प्रोजेक्‍टची माहितीही ती या अकाउंटवरून देणार आहे. “फन्ने खान’मध्ये तिच्याबरोबर राजकुमार राव असणार आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button