breaking-newsराष्ट्रिय

ऐन निवडणुकीच्या तोंडावर मेहुण्याने शिवराज सिंह चौहान यांना दिला झटका

पंधरा वर्ष आणि तीन विधानसभा निवडणुकांनंतर मध्य प्रदेशच्या राजकारणात पुन्हा एकदा इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. ऐन विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर मुख्यमंत्री शिवराज सिहं चौहान यांचे मेहुणे संजय मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला आहे. काँग्रेसच्या प्रचार समितीचे प्रमुख ज्योतिरादित्य सिंदिया आणि प्रदेशाध्यक्ष कमलनाथ यांच्या उपस्थितीत संजय मसानी यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केला. शिवराज सिंह चौहान यांच्यासाठी कौटुंबिक पातळीवर हा एक झटका आहे. संजय मसानी शिवराज सिंह चौहान यांच्या पत्नी साधना सिंह यांचा भाऊ आहे.

मध्य प्रदेशला आता शिवराज सिंह चौहान यांची गरज नसून कमल नाथ सारख्या नेत्याची आवश्यकता आहे. शिवराज सिंह चौहान यांची सत्तेतील तेरा वर्ष हा खूप मोठा काळ आहे. आता दुसऱ्या कुणाला तरी संधी मिळाली पाहिजे असे संजय मसानी नवी दिल्लीतील काँग्रेस कार्यालयात पत्रकारांशी बोलताना म्हणाले. मध्य प्रदेशात एकप्रकारे इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे.

ANI

@ANI

Delhi: Sanjay Singh, brother-in-law of Chief Minister Shivraj Singh Chouhan, joins Congress party.

डिसेंबर २००३ मध्ये भाजपाने दिग्विजय सिंह यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचा मोठा पराभव केला व सत्ता मिळवली. त्यावेळी सत्ता गेल्यानंतर आठवडयाभराच्या आता दिग्विजय सिंह यांचे बंधु लक्ष्मण सिंह यांनी भाजपामध्ये प्रवेश केला होता. मोठया पराभवानंतर भावाने आपली पहिली साथ सोडली असे दिग्विजय त्यावेळी म्हणाले होते. आता सुद्धा तशाच प्रकारची पुनरावृत्ती झाली आहे.

राजस्थान पाठोपाठ मध्य प्रदेशमधुनही भाजपासाठी वाईट बातमी आहे. शिवराज सिंह चौहान यांच्या नेतृत्वाखालील भाजपा सरकारला झटका बसू शकतो. राज्याच्या गुप्तचर खात्याने आगामी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या विजयाची शक्यता वर्तवली आहे. गुप्तचर खात्याने ३० ऑक्टोंबरला मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांच्याकडे आपला सिक्रेट रिपोर्ट सोपवला. त्यामध्ये २३० सदस्यांच्या मध्य प्रदेश विधानसभेत काँग्रेसला १२८ जागा मिळतील असा अंदाज वर्तवण्यात आला आहे. भाजपाला ९२ जागांवर समाधान मानावे लागेल असे या अहवालात म्हटले आहे. मायावती यांच्या बहुजन समाज पार्टीला सहा तर अखिलेश यादव यांच्या समाजवादी पार्टीला तीन जागा मिळतील असा अंदाज आहे. हे दोन्ही पक्ष सध्या काँग्रेससोबत आहेत.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button