breaking-newsमहाराष्ट्रमुंबई
एसटीला डिझेलवर करमाफी द्यावी- दिवाकर रावते

मुंबई : डिझेलच्या किंमती सातत्याने वाढत असल्याने त्याचा एसटी महामंडळातील कर्मचाऱ्यांच्या वेतन करारावरही परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यातून मार्ग काढण्यासाठी राज्य सरकारने डिझेलवरील वेगवेगळे कर माफ करावेत, अशी मागणी परिवहन मंत्री आणि महामंडळाचे अध्यक्ष दिवाकर रावते यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांच्याकडे केली आहे.
इंधन दरवाढीमुळे महामंडळास वर्षाकाठी सुमारे ४०० कोटी रुपयांचा अतिरिक्त भार पडतो. अशातच एसटी कर्मचाऱ्यांचा प्रलंबित वेतनकरार रखडला आहे. पण, डिझेल किंमतीने वेतन करारावरही परिणाम होण्याची शक्यता आहे. या पार्श्वभूमीवर रावते यांनी मुख्यमंत्र्यांना सोमवारी पत्र दिले असून, त्यात एसटीच्या महामंडळाच्या आर्थिक स्थितीला डिझेलच्या वाढत्या दरांमुळे फटका बसत असल्याचे म्हटले आहे.