breaking-newsमहाराष्ट्रमुंबई

एसटीत ६,९४९ चालक-वाहकांची भरती

  • महिनाअखेरीस जाहिरात, वर्ग-३ मधील ६७१ जागांवरही संधी

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून (एसटी) येत्या वर्षांत सहा हजार ९४९ चालक-वाहकांची भरती केली जाणार आहे. यासाठी या नोव्हेंबरअखेरीस जाहिरात काढली जाईल, अशी माहिती एसटीतील वरिष्ठ अधिकाऱ्याकडून देण्यात आली. याशिवाय वर्ग-३ मधील ६७१ जागाही भरल्या जाणार आहेत.

जाहिरात काढल्यानंतर अर्ज स्वीकारणी व अन्य प्रक्रिया पार पाडल्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारी २०१९ मध्ये परीक्षा घेण्यात येतील. एसटी महामंडळात १८ हजार बसगाडय़ा व एक लाखाहून अधिक कर्मचारी कार्यरत आहेत. यामध्ये जवळपास ३८ हजार चालक व ३४ हजार वाहक आहेत. मात्र वर्षांला निवृत्त होणारे कर्मचारी, कामाची वाढलेली व्याप्ती, बसगाडय़ांची व फेऱ्यांची संख्या पाहता मोठय़ा संख्येने चालक-वाहकांची गरज आहे. गेल्या वर्षी एसटी महामंडळाने मुंबई, रायगड, पालघर, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, ठाणे या कोकण प्रदेशासाठी सात हजार ९०० चालक-वाहकांची भरती प्रकिया सुरू केली. जवळपास पाच हजार जागा भरल्या गेल्या. उर्वरित पदांवर किरकोळ कारणांमुळे निवड न होऊ शकल्याने एसटी महामंडळाने पुन्हा निवडीची प्रक्रिया सुरू केली आहे. महामंडळाने पाच महिन्यांपूर्वी तीन हजार ५४ चालक-वाहक पदे भरण्याची घोषणाही केली. मात्र, ही पदे भरण्याची प्रक्रिया काही कारणास्तव थांबली. आता महामंडळाने कोकण सोडता राज्यातील अन्य भागांसाठी चालक-वाहकांची भरती करण्याचा निर्णय घेतला आहे. नोव्हेंबरअखेरीस याची जाहिरात, त्यानंतर जानेवारी किंवा फेब्रुवारीत परीक्षा व अन्य प्रक्रिया पार पाडल्या जाणार आहेत.

भरती कोठे?

ही भरती पुण्यासह नाशिक, औरंगाबाद, अमरावती, नागपूर विभागांत होणार आहे. यात मुंबईचाही पुन्हा विचार केला जात आहे. चालक-वाहकांव्यतिरिक्त वर्ग-३ मधील वरिष्ठ लिपिक, यांत्रिकी विभागातील जागांसह अन्य पदेही भरली जातील. वर्ग-३ मधील ६७१ जागा भरण्यात येणार आहेत. अधिकारी वर्गाच्याही ६९ जागा भरल्या जातील.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button