breaking-newsआंतरराष्टीय

एव्हरेस्टवर अडकलेल्या भारतीयांची सुषमा स्वराज यांच्याकडे मदतीची मागणी

काठमांडू : एव्हरेस्ट शिखरावर 15 भारतीय अडकले असल्याचे वृत्त समोर आले आहे. एव्हरेस्ट शिखरावर अडकलेल्या या 15 जणांनी ट्विट करून परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांच्याकडे मदतची मागणी केली आहे. स्वराज यांनीही या घटनेची दखल घेतली असून, त्यांनी तातडीने नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकारी मनजीव सिंह पुरी यांना या प्रकरणात गांभीर्यानं लक्ष देण्यास सांगितले आहे. गेल्या 3 दिवसांपासून हे भारतीय एव्हरेस्टवर अडकले आहेत. खराब हवामानामुळे येथील सर्व विमान उड्डाणे रद्द झाली आहेत. त्यामुळे या लोकांना बाहेर येण्याचा मार्ग उरला नसल्याची माहिती समोर आली आहे.

अमित थढानी नावाच्या एका गिर्यारोहकाने शनिवारी सुषमा स्वराज आणि परराष्ट्र मंत्रालयाच्या ट्विटर हँडलला टॅग करून मदतची मागणी केली. ‘आम्ही लुकलामध्ये अडकलो आहोत. आम्ही एकूण 15 भारतीय आहोत. स्थानिक दूतावासाशी संपर्क साधला. मात्र, अद्याप कोणतीही मदत मिळू शकलेली नाही. आमची मदत करू शकता का?,’ असं त्यांनी ट्विटमध्ये म्हटलं आहे. ट्विटची गांभीर्यानं दखल घेत सुषमा स्वराज यांनी नेपाळमधील भारतीय दूतावासातील अधिकाऱ्यांना या प्रकरणाकडे लक्ष देण्याची सूचना केली. दरम्यान, सर्व भारतीयांना सुखरुप बाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत, अशी माहिती भारतीय दूतावासाच्या अधिकृत ट्विटर हँडलवरून देण्यात आली.

 

Amit Thadhani
@amitsurg
Currently stranded in Lukla since 2 days, Nepal, with copter company looters refusing to evacuate us to KTM unless we pay 600 dollars per head. We paid 200 dollars per head fare from KTM to Lukla. @MEAQuery can you please help? https://twitter.com/gabbbarsingh/status/1000299062749351938 …

4:53 PM – May 26, 2018
98
146 people are talking about this
Twitter Ads info and privacy

Sushma Swaraj

@SushmaSwaraj
Manjeev – Pls see this. @IndiaInNepal https://twitter.com/amitsurg/status/1000336630337581056 …

7:00 PM – May 26, 2018
797
181 people are talking about this

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button