एमबीए व एमएमएस अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर

पुणे – राज्यातील शासकीय, अनुदानित व खासगी विनानुदानित व्यवस्थापन संस्थांमधील एमबीए व एमएमएस या पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांच्या प्रवेशाचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. ऑनलाईन नोंदणीची प्रक्रिया दि. 7 जूनपासून सुरू झाली असून दि. 21 जूनपर्यंत सुरू राहणार आहे.
राज्य सामायिक प्रवेश चाचणी कक्षामार्फत व्यवस्थापन अभ्यासक्रमांची प्रवेश प्रक्रिया राबविली जाणार आहे. एमएच-एमबीए/एमएमएस-सीईटी या परीक्षेसह जीमॅट, कॅट, मॅट, आत्मा, एक्सएटी व सीमॅट या प्रवेश परीक्षांमधील गुण प्रवेशासाठी पात्र धरले जातील. सीईटीला नोंदणी न केलेल्या अन्य विद्यार्थ्यांना ऑनलाईन नोंदणी करण्यासाठी ऑनलाईन शुल्क भरावे लागणार आहे. प्रवेशासाठी तीन केंद्रीयभुत प्रवेश फेरी (कॅप) घेतल्या जाणार आहेत. दि. 26 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध होईल. त्याच दिवशी कॅप एकसाठी प्रवेशासाठीच्या जागा जाहीर होतील. त्यानंतर दि. 23 जून रोज तात्पुरता यादी लागेल. दि. 24 व 25 जून रोजी यादीवरील आक्षेप स्वीकारले जातील. त्यानंतर दि. 26 जून रोजी अंतिम गुणवत्ता यादी प्रसिद्ध केले जाणार आहे. एमबीए व एमएमएस या अभ्यासक्रमाचे सविस्तर वेळापत्रक www.dte.org या संकेतस्थळावर उपलब्ध करून देण्यात आली आहे.