breaking-newsराष्ट्रिय
एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र रहावे – अकाली दल

चंडीगढ – मित्रपक्षांपर्यंत पोहचण्याची मोहीम हाती घेतलेले भाजपचे अध्यक्ष अमित शहा यांनी आज शिरोमणी अकाली दलाच्या (एसएडी) नेत्यांची भेट घेतली. त्यानंतर एसएडीचे अध्यक्ष सुखबीरसिंग बादल यांनी त्यांचा पक्ष भाजपचा कायमस्वरूपी मित्र असल्याची ग्वाही दिली. एवढेच नव्हे तर, आगामी लोकसभा निवडणुकीसाठी एनडीएच्या सर्व घटक पक्षांनी एकत्र रहावे, असे आवाहनही त्यांनी केले.
महत्वाची राजकीय लढाई अवघ्या सहा महिन्यांवर येऊन ठेपली आहे. कुठले मतभेद असले तर ते विसरून एक योजना बनवूूया, असे त्यांनी एनडीएतील घटक पक्षांना उद्देशून म्हटले. शिवसेनेप्रमाणेच एसएडीही भाजपवर नाराज असल्याची चर्चा होती. मात्र, बादल यांनी मांडलेल्या भूमिकेमुळे या चर्चेला पूर्णविराम मिळाला आहे.