एखाद्याच्या मुत्यूनंतर असे वक्तव्य करणे अयोग्य – मुख्यमंत्री

मुंबई – राफेल खरेदी व्यवहार अमान्य असल्याने तत्कालीन संरक्षणमंत्री मनोहर पर्रिकर यांनी राजीनामा दिला आणि गोव्यामध्ये परतले असे वक्तव्य राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी केले होते. या वक्तव्याचा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाचार घेतला आहे.
‘राहुल गांधी यांनीही याआधी असेच काहीसे बोलण्याचा प्रयत्न केला होता. परंतु त्यावेळी मनोहर पर्रिकर जिवंत होते आणि त्यांनी योग्य ते उत्तर दिले होते. परंतु आता एखाद्याच्या मृत्यूनंतर असे वक्तव्य करणे अयोग्य आहे, असे म्हणत मुख्यमंत्री फडणवीस यांनी शरद पवारांच्या वक्तव्यावर सडकून टीका केली.
गोव्याचे मुख्यमंत्री मनोहर पर्रिकर यांचे कर्करोगाने दीर्घ उपचारानंतर निधन झाले. मृत्यूपूर्वी देखील ते आपल्या कामाप्रति प्रामाणिक होते. मृत्यूच्या आठ दिवस आधी त्यांनी मला मोदींसाठी दोन प्रचारसभा करण्याची संधी मिळायला हवी अशी इच्छा व्यक्त केली होती. कारण मोदींसारखा पंतप्रधान पुन्हा होणे नाही, असे पर्रिकर म्हणत होते. परंतु आज त्यांच्या मृत्यूनंतर राजकीय लाभासाठी त्यांचा वापर करणे योग्य नसल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
https://twitter.com/ANI/status/1117346089693327360