Views:
279
अमरावती । प्रतिनिधी
अमरावतीमध्ये पुढील आठवड्याभरासाठी लॉकडाऊन लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. अमरावतीच्या पालकमंत्री यशोमती ठाकूर यांनी यासंदर्भातील माहिती दिली. सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. रविवारी पार पडलेल्या अतिशय महत्त्वाच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला.
सोमवारी रात्री 8 वाजल्यापासून कोरोनाशी सुरु असणाऱ्या या लढ्याच्या पार्श्वभूमीवर हा लॉकडाऊन लागू करण्यात येणार आहे. नागरिकांना सतर्कता राखण्याचं आणि काळजी घेण्याचं आवाहन कोरोना विषाणूचा वाढता संसर्ग आणि नागरिकांचा बेजबाबरपणा यामुळं ओढावलेलं संकट पाहता अखेर हा निर्णय घेण्यात आला.
शनिवारी अमरावतीमध्ये 1 हजारहून अधिक नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली आणि सर्वांनाच धडकी भरली. कोरोना नेमका किती वेगानं फैलावत आहे, याचा स्पष्ट अंदाज हे आकडे पाहून आला. परिणामी सुरुवातीला फक्त काही तासांपुरताच सीमित ठेवण्यात आलेला लॉकडाऊनचा निर्णय थेट पुढील आठवड्याभरापर्यंत कायम ठेवण्यात आला. प्रशासनाच्या या निर्णयाअंतर्गत काही नवे निर्देशही देण्यात आले.
Like this:
Like Loading...