breaking-newsताज्या घडामोडीराष्ट्रिय

एकूण रुग्णसंख्या 24.16 लाखांवर; जायडस कॅडिलाने 2800 रुपयांत लॉन्च केले कोरोनाचे रेमडेसिविर ऑषध

फॉर्मास्यूटिकल कंपनी जायडस कॅडिलाने गुरुवारी कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी रेमडेसिविर औषध भारतीय बाजारात लॉन्च केले. या औषधाचे नाव ‘रेमडेक’ ठेवले आहे. रेमडेकच्या 100 मिलीग्राम औषधाची किंमत 2,800 रुपये ठरवण्यात आली आहे. जायडस कॅडिलाने सांगितले की, हे औषध सरकारी आणि खासगी रुग्णालयात मिळेल. जायडस देशातील पाचवी कंपनी आहे, ज्यांनी अँटीवायरल औषध लॉन्च केले आहे. यापूर्वी फार्मा कंपनी हेटेरो लॅब्स, सिप्ला, मायलन एनवी आणि जुबिलेंट लाइव्ह सायंसेसने औषध लॉन्च केले आहे.

दरम्यान देशातील रुग्णांचा एकूण आकडा 24 लाख 16 हजार 141 झाला आहे. बुधवारी देशात 67 हजार 66 रुग्णांची संख्या वाढली. सध्या देशभरात 6,55,447 रुग्णांवर उपचार सुरू असून, 17,12,895 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. ही आकडेवारी covid19india नुसार आहे.

दरम्यान, देशात पुन्हा सर्वाधिक 12,712 रुग्ण महाराष्ट्रात आढळले आहेत. दरम्यान, 13,804 पेक्षा जास्त रुग्ण कोरोनावर मात करत घरी गेले आहे. आता राज्यात एकूण रुग्णांची संख्या साडेपाच लाखांच्या आसपास आहे.

भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेने (आयसीएमआर) म्हटले आहे की 12 ऑगस्ट रोजी देशात 8 लाख 30 हजार 391 चाचण्या घेण्यात आल्या आहेत. त्याचबरोबर आतापर्यंत 2 कोटी 68 लाख 45 हजार 688 नमुन्यांची तपासणी करण्यात आली आहे.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button