breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवडपुणे

एकविरा देवीच्या मंदिराचा कळस चोरणारे चोरटे पोलीसांच्या ताब्यात

पुणे – कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरलेल्या चोरट्यांना पकडण्यात पुणे ग्रामीण एलसीबी पथकाला यश आले आहे. मंगळवार (दि.३ आँक्टोबर २०१७) रोजी पहाटेच्या सुमारास ही चोरी झाली होती.

राहुल भागवत गांवडे आणि सोमनाथ अशोक गांवडे (दोघेही रा. धामणगाव आवारी, ता.अकोले, जिल्हा अहमदनगर) असे अटक करण्यात आलेल्या दोघांची नावे आहेत.

प्राप्त माहितीनुसार, मंगळवार (दि.३ आँक्टोबर २०१७) रोजी पहाटेच्या सुमारास कार्ला गडावरील एकविरा देवीच्या मंदिराचा सोन्याचा कळस चोरीस गेला होता. तसेच अनेक दिवस उलटून देखील चोरटे सापडत नसल्याने विधानसभेत तारांकित प्रश्न उपस्थित झाल्यानंतर विविध यंत्रणांनी या प्रकरणाचा तपास केला. मात्र, कोणालाच यश मिळत नसल्याने दबाव वाढत चालला होता.

याबाबत पुणे ग्रामीणच्या स्थानिक गुन्हे शाखेने विविध पथके तयार करत तपास करत असताना नगर जिल्ह्यातील दोघांना ताब्यात घेत चौकशी केली असता त्यांनी कळस चोरीची कबूली दिली. मंगळवारी (दि. ७) सकाळी एलसीबी पथकाने स्थानिक ग्रामस्थ आणि पोलीस मित्र यांना सोबत घेत एकविरा देवीच्या डोंगरात शोध घेत चोरट्यांनी लपविलेला कळस हस्तगत केला.

ही कारवाई पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील, अपर अधीक्षक संदीप जाधव आणि विवेक पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली पुणे ग्रामीण एलसीबीचे पोलीस निरीक्षक पद्माकर घनवट, उपनिरीक्षक जीवन राजगुरु, विजय पाटील, दत्तात्रय जगताप, प्रकाश वाघमारे, शरद बांबळे, सचिन गायकवाड, गणेश महाडिक, रऊफ इनामदार, चंद्रशेखर मगर, अक्षय जावळे यांच्या पथकाने केली.

Job AlertJob Alert Job Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button