मनोरंजन
ऋषी कपूर यांचा ‘हा’ सिनेमा ऑगस्टमध्ये येणार प्रेक्षकांच्या भेटीला…

ऑगस्ट महिन्याच्या अखेरीस ऋषी कपूर यांचा “राजमा चावल” हा सिनेमा प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. ३१ ऑगस्टला प्रदर्शित होण्याऱ्या या चित्रपटाची कथा वडील, मुलगा आणि सोशल मीडिया यावर आधारित आहे. या चित्रपटद्वारे बॉलीवूडमध्ये अनिरुद्ध तन्वर आणि अमायरा दस्तूर हे दोन नवीन कलाकार पदार्पण करीत आहेत.
या चित्रपटाचे दिग्दर्शन लीना यादव करत असून चित्रपटाची निर्मिती कॅप्टन गुलाबसिंग तन्वर तसेच लीना आणि असीम बजाज करीत आहेत. बघूयात आता यांचा “राजमा चावल” बॉक्स ऑफिसवर कितपत शिजतो.