breaking-newsताज्या घडामोडीपिंपरी / चिंचवड

उमेदवारांच्या प्रचारावर बारीक लक्ष, प्रसिद्धीवर मीडिया कक्षाची नजर

पिंपरी – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्हा निवडणूक विभागाच्यावतीने राजकीय पक्ष व निवडणूक लढविणाऱ्या उमेदवारांच्या प्रचार, प्रसिद्धीवर लक्ष ठेवण्यासाठी मीडिया कक्षाची स्थापना करण्यात आली असून या कक्षाची उमेदवारांच्या बारीक-बारीक हालचालींवर नजर आहे.

निवडणूक लढविणा-या प्रत्येक राजकीय पक्ष व इतरही निवडणूक लढविणा-या उमेदवारांनी निवडणुकीसंदर्भात प्रचारासाठी एसएमएस, जाहिरात व इतर प्रसिद्धीबाबत माध्यम प्रामाणिकरण आणि सनियंत्रण समितीची (एमसीएमसी) पूर्व परवानगी घेणे बंधनकारक केले आहे. तसेच निवडणूक निर्णय अधिका-यांच्या नियंत्रणाखाली मीडिया कक्षाचे काम सुरू असून या कक्षातूनच राजकीय पक्ष, उमेदवारांना प्रचार साहित्य प्रसारीत, प्रकाशित करण्यापूर्वी तपासून घ्यावे लागत आहे.

या कक्षाच्या माध्यमातून वृत्तपत्रातील जाहिराती, दृकश्राव्य (आॅडिओ, व्हिडिओ) तसेच सोशल मीडियावरील जाहिरातींवर नियंत्रण ठेवण्यात येत आहे. सतत चोवीस तास कक्षाचे १५ कर्मचारी, अधिकारी कार्यरत आहेत. या सोबतच मीडिया कक्षातील तज्ज्ञांकडून सोशल मीडियावर लक्ष ठेवण्यात येत आहे.

आक्षेपार्ह मजकूराला आळा
कोणत्याही उमेदवाराने जाहिरात करीत असताना त्यातून धर्मांमध्ये तेढ निर्माण होणार नाही, वैयक्तिक आरोप होणार नाही, कोणाची बदनामी होईल अशा आक्षेपार्ह मजकुरासह काही अप्रिय घटना, तणाव निर्माण होणार नाही यासाठी अशा मजकुरास आळा घालण्यात येत आहे. इतकेच नव्हे समितीला एखादी मजकूर नाकारण्याचा अधिकार आहे.

अर्ज भरुन घेत दक्षता
उमेदवार प्रसारीत करणार असलेल्या मजकुरासाठी मीडिया कक्षात नमुना ‘क’चा अर्ज भरुन घेतला जात असून त्यात संबंधित स्क्रीप्ट कोठे वाजविणार आहे, याची माहिती घेतली जात आहे. एखाद्या उमेदवाराने संबंधित मजकूर या ठिकाणाहून प्रमाणिकरण करून घेतलेला नसल्यास नोटीस बजावण्यात येत जाते.

Job AlertJob Alert Job Alert

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button