उपाशी मरणाऱ्या भिकारणीच्या खात्यात 9 कोटी, तर घरात सापडले अडीच लाख रुपये

वॉशिंग्टन (अमेरिका) – अगदी उपाशी पोटी मरण पावलेल्या एका भिकारणीच्या बॅंकेच्या खात्यात 9 कोटी रुपये आणि घरात सुमारे अडीच लाख रुपये आढळले आहेत. पैसा हे सर्वस्व आहे आणि पैशाने सारे काही प्राप्त होते असा एक सार्वत्रिक समज आहे. पण तो अनेकदा अत्यंत चुकीचा असल्याची अशी अनेक उदाहरणे दिसून येत असतात.
लेबनॉनमधील फातिमा (52) नावाच्या भिकारणीची गोष्ट अशीच आहे. एक अपंग भिकारीण उपासमारीमुळे मरण पावली होती. मात्र तिची चौकशी केल्यानंतर अनेक धक्कादायक गोष्टी उघडकीस आल्या. फातिमाच्या खात्यामध्ये 9 कोटी रुपये (10 लाख पौंड्स) असल्याचे आढळले, तर तिच्या खोलीमध्ये सुमारे अडीच लाख रुपये (दहा लाख पौंड्स) जमा असल्याचे दिसून आहे. तिच्या खोलीतील दोन पोत्यांमध्ये 2 लाख 24 हजार रुपये म्हणजे सुमारे अडीच हजार पौंड आढळले आहेत.
लॅबेननची राजधानी बैरुत (लॅबेनॉन) येथे फातिमा नावाच्या भिकारणीचा मृत्यू हृदयविकाराने झाला. पोलीसांनी अल-जहाब या शहरातीतल तिच्या नातेवाईकांना बोलावून घेऊन तिचे सारी संपत्ती त्यांच्या ताब्यात दिली, तेव्हा त्यांनाही आश्चर्याचा धक्काच बसला.